मोठी बातमी..भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार
भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री गोळीबार केला.
हिललाईन पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांमध्ये माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, सोलापूर जिल्ह्यातील
अनेक गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढले जात आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. दरम्यान उल्हासनगर शहरात सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाला.
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या.
धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


0 Comments