स्व. आबासाहेबांना डॉ. अनिकेत देशमुख यांचे कडून अनोखी श्रद्धांजली !
आरोग्य क्षेत्रात, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा, हे व्रत धरून
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य दूतांना दिला जाणारा
वर्ल्ड हेल्थ वेलनेस काँग्रेस या जागतिक संस्थेच्या वतीने दिला जाणार बेस्ट इन क्लास फोर ऑर्थोपेडिक केअर
हा मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार नुकताच आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांना १६ फेब्रुवारी रोजी
मलेशियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर कोहकर चई यांच्या हस्ते मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार म्हणजे सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला. परंतु हा पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी मनोगत मांडताना
हा पुरस्कार स्वर्गीय आबासाहेब देशमुख व त्यांच्या वरती अपार प्रेम करणाऱ्या सांगोला तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांचा माझ्यासाठी आशीर्वाद आहे.
म्हणून डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी उत्तम जरे त्यांच्याबद्दल एवढेच म्हणेन.ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्या .
ज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी दोन गाणी द्या. ज्यांची उंची आकाशाएवढी, त्यांनी थोडं खाली या.
ज्यांचे जन्म मळले मातीत, त्यांना, अनिकेत भैया तुम्ही; 'उचलून वर घ्या'. उत्तम जरे - राष्ट्रीय संचालक अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन




0 Comments