ब्रेकिंग न्यूज...सगे सोयऱ्यांना मराठा आरक्षण अध्यादेश जारी करावा
मराठा समाजाकडून आम. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन
(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- सगे सोयऱ्यांना मराठा आरक्षण अध्यादेश अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज सांगोला यांच्या वतीने काल शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी
आम. शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज बांधवाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासपुष्पहार अर्पण करून घोषणा देत
सांगोला शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला येथील मिरज रोडवरील कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू केले
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणामधील कुणबी नोंदी सापडलेल्या शेतकऱ्यांना कुणबी आरक्षण प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. परंतु सगे सोयऱ्यांना कुणबी आरक्षण प्रमाणपत्रअध्यादेशाची, अंमलबजावणी करावी.
तसेच मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समर्थकांकडुनपाटील, संजय भोसले, राजू मगर, जगदीश पाटील, सुनील गायकवाड,. राजेंद्र पाटील, राजू मगर, माऊली गायकवाड,
प्रताप इंगोले, धीरज पवार,रुपेश पवार, बापू गोडसे, वसंत दिघे, बाळासो शिंदे,प्रवीण इंगोले यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनेया आंदोलनामध्ये सामील झाला होता.


0 Comments