छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोळे येथे उत्साहात साजरा.
कोळे प्रतिनिधि:- थोरला गणपती मंडळ कोळे यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंतीचे आयोजन करण्यात आले.
महाराजांच्या जयंतीनिमित्त भूपालगड म्हणजेच सद्याचे बानुरगड येथून शिवज्योत प्रज्वलन करून पायी चालत
असंख्य शिवभक्त कोळे या ठिकाणी स्टँड परिसर येथून जय भवानी जय शिवाजी घोषणा देत लक्ष्मी चौक ठिकाणी येऊन महाराजांच्या कार्यक्रमा ठिकाणी सदर
ची शिवज्योत स्थानबद्ध करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ही शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमासाठी थोरला गणपती मंडळ कोळे यांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि कोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments