ब्रेकिंग न्यूज... 'ते अजूनही बोलण्याच्या स्थितीत..' शहाजी बापुनी सांगितली गायकवाडांची हेल्थ अपडेट आमदार शहाजी बापू पाटील रुग्णालयात
शुक्रवारी उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. कल्याण पूर्वचे
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला.
यामध्ये महेश गायकवाड यांच्यासह त्यांचा साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
काल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यानंतर आज आणखी एक शिंदे गटाचे आमदार रुग्णालयात पोहचले आहे.
आमदार शहाजी बापू पाटील रुग्णालयात
शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची भेट घेतील. शहाजी बापू पाटील मेडिकल शिबिराला भेट देण्यासाठी आले
असता त्यांनी गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महेश गायकवाड यांची प्रकृती अजूनही गंभीर आहेत, ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत.
तर राहुल पाटील यांची प्रकृती ठीक आहे असे म्हणाले. तर आमदार गणपत गायकवाड यांच्या टीकेला बोलताना वैयक्तिक टीका करणे योग्य नसल्याचे पाटील म्हणाले.
संजय राऊत करत असलेले आरोप राजकीय आहेत, त्याला पक्षीय रंग देऊ नये. संजय राऊत यांना काहीच काम नसल्याने ते असे बोलतात, अशी प्रतिक्रिया पाऊत यांच्या आरोपांवर दिली.
भुजबळ यांच्या राजीनाम्यावर बोलताना शहाजी बापू म्हणाले की ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले जाणार असल्याने यावर लवकरच तोडगा निघेल.
मुख्यमंत्री खासदार पुत्रासह रुग्णालयात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल (शुक्रवारी) घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली
तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे
अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. महेश गायकवाड हे खासदार श्रीकांदे शिंदे यांचे कट्टर समर्थक आहे.
त्यामुळे महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया होत होती, तेव्हा खासदार रात्रभर रुग्णालयात दाखल होते.
0 Comments