संत निरंकारी मंडळाच्या बारामती येथील सत्संग सोहळ्याचा डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतला लाभ
सांगोला /( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२): अखिल मानव मात्राला शांती आणि प्रेमाचा संदेश देणारे संत निरंकारी मंडळ. निरंकारी सद्गुरु स्वरूप परमपूज्य सदिक्षा माताजी यांच्या दर्शनाचा आनंद सांगोला तालुक्याचे भावी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतला.
संत निरंकारी मंडळ जगाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देण्याचे काम जगभरात सुरू आहे .मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी निरंकारी मंडळाचा विशाल निरंकारी सत्संग सोहळा बारामती येथे आयोजित केला होता .
त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून निरंकारी सद्गुरु मातेचे आशीर्वाद, अमृत विचार श्रवण करण्यासाठी उपस्थित होते.
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या निरंकारी सत्संग सोहळ्यात सुदिक्षा मातेच्या दर्शनाचा लाभ व आनंद घेतला.
0 Comments