पश्चिम बंगालमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी सांगोला येथे हिंदू
जनजागृती समितीची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सांगोला, (जिल्हा सोलापूर), 28 फेब्रुवारी वार्ता - पश्चिम बंगाल येथील संदेशखाली क्षेत्रामध्ये तृणमूल काँग्रेसचे शाहजहा शेख यांने अनेक हिंदू महिलांवर व मुलींवर अत्याचार केले आहेत तरी शेख यास तात्काळ अटक करावी
व पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या नावे तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल येथील संदेश खाली क्षेत्रामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहा शेख यांने अनेक हिंदू महिलांवर व मुलींवर अत्याचार केले आहेत त्याला जी महिला पसंत पडेल त्या महिलेला
त्याच्या पार्टी कार्यालयामध्ये बोलवलं जात होतं व तेथे त्यांच्यावर अत्याचार केले जात होते या घटनेमध्ये अनेक हिंदू महिला या अत्याचाराला बळी पडल्या आहेत
हा केवळ लव्ह जिहादचा प्रकार नसून तृणमूल काँग्रेसचा हिंदू द्वेषच आहे एवढे गंभीर प्रकरण असूनही यामध्ये तेथील
पोलीस किंवा शासन यांनी कोणतीही कारवाई केली नाही. पश्चिम बंगालमध्ये वारंवार देवी देवतांचे विडंबन, देवतांच्या मूर्तीची तोडफोड, हिंदू महिलांवर अत्याचार हिंदुत्वनिष्ठांची हत्या,
हिंदू सणांच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकींवर आक्रमण करणे या घटना वारंवार घडतच आहे
काही दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रचारासाठी गेले असता तेथे बॉम्ब हल्ला व दगडफेक करण्यात आली.
तसेच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या लोकांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला
त्या कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांवर पण आक्रमण करण्यात आले आहे. एकूणच सर्व घटनांमध्ये बंगालमधील हिंदू आपले प्राण मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी सुद्धा हिंदूंच्या विरुद्ध डायरेक्ट ऍक्शन प्लॅन चा वापर केला होता, अशाच पद्धतीने हा प्रकार तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल मध्ये करत आहे बंगालमध्ये हिंदूंवर होणारे
अन्याय अत्याचार रोखण्यासाठी पश्चिम बंगाल राज्य सरकार तातडीने स्थगित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
हे निवेदन पंतप्रधान भारत सरकार तसेच राष्ट्रपती भारत सरकार यांच्या नावे देण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर मानस कमलापूरकर अजय तेली,
गणपत पटेल, आकाश शिंदे, प्रशांत राजमाने, विकास गावडे, संतोष पाटणे सर आधी धर्मप्रेमी उपस्थित होते हे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वीकारले व पुढे तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो असे सांगितले.


0 Comments