google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बॉडीबिल्डर संकेत काळे यांचा भव्य सत्कार सोहळा व विजयी मिरवणूक

Breaking News

बॉडीबिल्डर संकेत काळे यांचा भव्य सत्कार सोहळा व विजयी मिरवणूक

बॉडीबिल्डर संकेत काळे यांचा भव्य सत्कार सोहळा व विजयी मिरवणूक


सलग तीन वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवल्याबद्दल सांगोला तालुक्यातील सुपुत्र संकेत संजय काळे यांची 

आज शनिवार 10 फेब्रुवारी रोजी भव्य विजय मिरवणूक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

आमदार गोपीचंद पडळकर, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख,डॉ.अनिकेत देशमुख, 

भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, पी.सी. झपके सर, मा.अतुल पवार, मा.प्रभाकर माळी, मा.रमेश जाधव, मा.तानाजी काका पाटील, मा.समाधान पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.

नुकत्याच केरळ येथे पार पडलेल्या  ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन चॅम्पियनशिप २०२२-२३  संकेत काळे याने रौप्य पदक जिंकून नॅशनल चॅम्पियनशिप

 मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. गेल्या वर्षी देखील याच स्पर्धेत संकेत याने तिसरा क्रमांक मिळवला होता.

सायंकाळी 6 वाजता अंबाबाई मंदिर सांगोला ते जिव्हाळा कॉलनी (वासूद रोड) निवासस्थान येथे भव्य विजयी मिरवणूकीचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे.

Post a Comment

0 Comments