डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
सांगोला--डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे प्रा. तानाजी सूर्यगंध सर प्राचार्य सिकंदर मुलाणी यांच्या हस्ते
प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व विनम्र आदरांजली व कोटी कोटी प्रणाम करण्यात आले छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत.
याचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट करतात, की शिवाजी महाराज एक शूर योद्धा होते. त्यांनी सतराव्या शतकात पश्चिम भारतात स्वतंत्र मराठा साम्राज्य उभारले
त्यांनी आपल्या कर्तुत्वाने अखंड ठसा उमटविला शिवाजी महाराज एक महान रणनीतीकार आणि एक शूर असे योद्धा होते. त्यांना तरुणपणातच देशभक्तीची तीव्र भावना प्राप्त झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल आणि आदिल शाही सुलतानाचा सामना करण्यासाठी गनिमा कावा नावाची प्रभावी गनिमी युद्धाची तयारी केली.
तर पोर्तुगीज, सिद्धी आणि ब्रिटिश ताफयाचा मुकाबला करण्यासाठी नौदल, युद्ध सहित साहसी वापरल्या. या त्यांच्या कल्पकतेतून आणि कर्तृत्वातून रायगड, कोंढाणा, तोरणा यासह अनेक किल्ले त्यांनी जिंकले .
त्यांनी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपले वर्चस्व निर्माण केले. तेव्हा संपूर्ण जगाला, देशाला समग्र समाज व्यवस्थेला मार्गदर्शक विचार छत्रपती शिवरायांच्या रूपानं मिळालेला आहे.
तेव्हा छत्रपती शिवरायांचा आदर्श व प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून आपण जगले पाहिजे अशा या थोर युद्ध्याला कोटी कोटी प्रणाम त्यांना विनम्र आदरांजली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य सिकंदर मुलाणी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र व कार्य स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दीपक रिटे यांनी केले. तर आभार प्रा. हनुमंत कोळवले यांनी मांडले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments