google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...जेवण करतानाच कुऱ्हाडीने तोडली मान; मित्रानेच मित्राला संपवलं

Breaking News

खळबळजनक घटना...जेवण करतानाच कुऱ्हाडीने तोडली मान; मित्रानेच मित्राला संपवलं

 खळबळजनक घटना...जेवण करतानाच कुऱ्हाडीने तोडली मान; मित्रानेच मित्राला संपवलं


राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून गुन्हेगारीच्या काही ना काही घटना समोर येत असतात. यात काहीवेळी किरकोळ कारणावरुन जवळच्या व्यक्तीचीच हत्या केल्याच्याही घटना ऐकायला मिळतात.

 सध्या वाशिममधूनही अशीच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. मानेवर कुऱ्हाडीने वार करत मित्रानेच आपल्या मित्राचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे.

नेहमी सोबत राहणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राची मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केली. ही घटना रात्री 9 च्या सुमारास वाशिमच्या कारंजा तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे. 

या हत्येच्या घटनेमुळे टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचं नांव संतोष घोरमोडे असून त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दारू प्यायल्यानंतर संतोष घोरमोडे आणि त्याच्या मित्रामध्ये शाब्दिक वाद झाला होता. यानंतर संतोष घोरमोडे हा स्वतः च्या घरी येऊन जेवण करत होता. 

याचवेळी आरोपी मित्राने अचानक येऊन त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातले. यामुळे संतोष घोरमोडे रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

संतोष घोरमोडेची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध धनज बुद्रुक पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अंकुश वडतकर, पोलीस कर्मचारी

 शिवाजी ठवकर आणि इतर घेत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments