निंदनीय घटना.... पत्नी झोपी गेली की तो करायचा आपल्याच
अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! माण तालुक्यातील घटना...
समाजातील नितीमत्ता रसातळाला गेली असल्याचा अनेक घटना समोर येत असतानाच बापानेच आपल्या कोवळ्या मुलीवर
वारंवार बलात्कार केला असल्याची एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
मुलीचे आपल्या आईपेक्षाही वडिलांवर अधिक प्रेम असते असे म्हटले जाते आणि बाप देखील आपल्या लाडक्या
लेकीवर जीवापाड प्रेम करतो, तिची हौस, कोडकौतुक पुरवतो तसे तिच्या सुरक्षेची देखील पुरेशी काळजी तो घेत असतो.
बापाच्या कुशीत लेक सुरक्षित असते पण बापाच्या रुपात काही राक्षस देखील समोर येत असतात. बापानेच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याच्या
निंदनीय घटना अधूनमधून समोर येत असतात. अशातच एक भयानक घटना उघडकीस आली
असून, पत्नी झोपी गेली की नराधम बाप सतत आपल्या लहानग्या मुलीवर बलात्कार करीत राहिला. भीतीने मुलगी गप्प राहिली पण जेंव्हा ती गर्भवती झाली तेंव्हा सगळाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला
आणि राक्षसी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुलगी आणि वडील यांच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेचा संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे.
सदर घटना माण तालुक्यात घडली असून दहिवडी पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून, पिडीत मुलीचे वय १२ वर्षे ६ महिने एवढे आहे.
ही मुलगी गर्भवती राहिली तेंव्हा अंधारातील सर्व प्रकार प्रकाशात आला आणि पिडीत मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. पत्नी गाढ झोपली की नराधम बाप आपल्याच मुलीच्या देहाचे लचके तोडत असायचा.
हा प्रकार एकदा घडला नाही तर तब्बल दोन वर्षांपासून राक्षसी बाप हे भयानक कृत्य करीत होता. या कृत्याने अल्पवयीन मुलगी घाबरून गेलेली होती आणि त्यामुळे तिने याबाबत कुठेही काही सांगितले नाही,
याचाच फायदा बाप घेत राहिला आणि दोन वर्षे तिच्यावर अत्याचार करीत राहिला. पण जेंव्हा ही अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले तेंव्हा सगळे भांडे फुटले.
आपली मुलगी गर्भवती आहे हे पिडीत मुलीच्या लक्षात आले तेंव्हा तिने पिडीत मुलीला विश्वासात घेवून सगळे काही विचारले. त्यानंतर या मुलीने बापाचे काळे कृत्य आईजवळ सांगितले.
मुलीने सांगितलेली कहाणी ऐकून आईच्या पायाखालील जमीन सरकली. आपल्या नवऱ्यानेच हे पातक केल्याचे समजल्यावर पिडीत मुलीच्या आईच्या डोक्यावर आभाळ कोसळले
आणि तिने थेट दहिवडी पोलीस स्टेशन गाठले. आपल्या नवऱ्याच्या पापाचा पाढा तिने पोलिसांसमोर वाचला. सगळा प्रकार ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला.
दहिवडी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत, राक्षसी नराधमाला बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी गजाआड केली.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली असून. जनमानसात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.



0 Comments