सांगोला तालुक्यातील दुष्काळी गावांना टँकर ने पाणीपुरवठा करा -
अभिषेक कांबळे-विरोधीपक्षनेते ना.विजय वड्डेटीवर यांना दिले निवेदन
विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता मा.ना.विजय वाडेट्टीवार यांची काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी भेट घेऊन
सांगोला तालुक्यातील दुष्काळी परीस्थिती पाहता काही गावातील जनतेचे व जाणावरांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत असुन यासंदर्भात तात्काळ दुष्काळी भागाला दिल्या
जाणाऱ्या उपाययोजना लागू कराव्यात व तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण होऊन पिण्याचे पाणी उपलब्ध नसलेल्या गावांना टँकर ने पाणीपुरवठा करण्यात यावा
असे निर्देश मा. जिल्हाधिकारी, सोलापूर व तहसीलदार, सांगोला यांना देण्यात यावे अश्या मागणीची निवेदन सांगोला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे व राज्य प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिले.
31 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाने सांगोला तालुका हा गंभीर स्वरूपाचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित केला
परंतु अद्याप यासाठी मिळणाऱ्या काही आवश्यक सवलती लागू केले गेल्या नसून त्यामुळे तालुक्यातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यामध्ये शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात आवश्यक ठिकाणी टँकर ने पाणीपुरवठा करणे, शेतसारा माफ करणे, मध्यंन भोजन योजना सुट्टीच्या दिवशी ही चालू ठेवणे, शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबाविणे, वीज बिलात सूट देणे,
विध्यार्थ्यांची फि माफ करणे यासंह अनेक उपयोजना करण्यात येतात परंतु अद्याप आवश्यक त्या योजना लागू नसल्याने सांगोला तालुक्यातील जनतेचे हाल होत असल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी दिली.
(चौकट )
सदर निवेदनाची दखल घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेता, मा.विजय वाडेट्टीवार यांनी तात्काळ यासंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांना पत्राद्वारे दिल्या.



0 Comments