google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला रामराम

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला रामराम

ब्रेकिंग न्यूज...बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला रामराम


मुंबई : बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. घोलप यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून घोलप यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने त्यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतले होते.

आज बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेटही घेतली होती. 

तेव्हापासून बबनराव घोलप हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकारणात सुरू होत्या. विशेष बाब म्हणजे, गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला देखील घोलप उपस्थित नव्हते.

उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

 या भेटीनंतर घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या. अखेर आज (गुरुवारी १५ फेब्रुवारी) बबनराव घोलप यांनी शिवसैनिकपदाचा राजीनामा दिला आहे.

बबनराव घोलप नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिलेले आहेत. ते १९९५ च्या युती सरकारच्या काळात मंत्री होते. त्यांनी नाशिक जिल्ह्यात ३० वर्षे एकहाती वर्चस्व ठेवत शिवसेनेला ताकद दिली. 

शिवसेना फुटल्यानंतरही त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले.
आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून आपल्या लेकीला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा घोलप यांची होती. 

मात्र, ऐनवेळी ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश दिल्याने घोलप नाराज झाले. या नाराजीतूनच त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments