सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते अमृत २.० योजनेचा शुभारंभ
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदी सभास्थळी दाखल झाले असून त्यांनी सभास्थळी उपस्थित असलेल्या सोलापुरकरांना संबोधित केले. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली.
पंतप्रधान म्हणाले की, “पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार करतो”. तसेच सोलापुरात अमृत २.० योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच रे नगर येतळी गृहप्रकल्पातील काही लाभार्थांना मोदींच्या हस्ते घरांची चावी सोपवण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. तसचे स्वनिधी योजनेतील काही लाभार्थ्यांना निधी देखील यावेळी सोपवण्यात आला.
पंतप्रधान म्हणाले की, ही वेळ आपल्या सर्वांसाठी भक्तीभावाने भरलेली आहे. २२ जानेवारी म्हणताच सभगृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणा थांबल्यानंतर मोदींनी आपले भाषण पुन्हा सुरू केले. २२ जानेवारीला तो क्षण येतोय भगवान आपल्या मंदिरात विराजमान होणार आहेत, असे मोदी म्हणाले.
पुन्हा सरकार स्थापन करणार
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, करोडो राम भक्तांचे मोदी स्वप्न पुर्ण करत आहेत. अबाधबीत अबू धाबी येथेही मंदिर बनत आहे, या मंदिराचे उद्घाटनही मोदी करणार आहेत. मोदींनी पंतप्रधान पदाची शपत घेतली ती देशासाठी आशेचे किरण होती.
मी दावोसवरुन आलोय, तिथे ऑफिसर मिनिस्टर, उद्योजक सर्वांच्या तोंडी मोदींचे नाव होते. मोदी सरकार पुन्हा देशात सरकार स्थापन करणार याची गॅरंटी आहे. महाराष्ट्रातही डबल इंजिनचे सरकार स्थापन होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
0 Comments