खाजाभाई बागवान लिखित पाऊलखुणा काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
सांगोला प्रतिनिधी:-(समाधान मोरे शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर - अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था
महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ जानेवारी २०२४ रविवार रोजी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटाने संपन्न झाले.
सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी कुरान पठन करून संमेलनाची सुरुवात केली यानंतर डॉ अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक , लेखिका प्रा. डॉ. अर्ज़िनबी युसुफ शेख हे होते.
यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सौ. सुरैय्या जहागीरदार , डॉ. अजीज नदाफ, मुख्य संयोजक प्राचार्य इ.जा. तांबोळी , अय्यूब नल्लामंदू , प्राचार्य शकील शेख ,अनिसाशेख ,अॅड. हाषम पटेल, मुस्लीम कबीर, कवी मुबारक शेख ,
सय्यद अलाऊद्दीन आष्टी , सायराबानू चौगुले रत्नागीरी , खजीनदार हसीब नदाफ इ उपस्थित होते. हे सर्व मान्यवर व हफिजा बागवान, तोलन बागवान, नूरजहा बागवान, रफिक बागवान, डॉ. नसरीन बागवान, सुमैय्या बागवान,
बशीर बागवान, कमरून बागवान यांच्या हस्ते कवि.खाजाभाई बशीर बागबान लिखित काव्यसंग्रह " आयुष्याच्या वाटेवर उमटलेल्या पाऊलखुणा" व " क्षणभंगूर हे जीवन " या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले .
यानंतर फराश फौंडेशन तर्फे डॉ. इ. जा. तांबोळी यांना समजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले तर अड. सिकंदर शेख यांच्या स्मरणार्थ फातिमाबी शेख सामाजिक पुरस्कार अमित उर्फ आम्रपाली
मोहिते यांना प्रदान करण्यात आला आणि शाहिदा सय्यद यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने युगस्त्री फातीमाबी शेख साहित्य पुरस्कार -२४ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
शफी बोल्डेकर यांनी प्रास्ताविक केले स्वागताध्यक्षा डाँ.सुरैय्या जहागीरदार यांनी सर्वांचे स्वागत करत शाल बुके देऊन सत्कार केले व आपल्या स्वागत अध्यक्ष भाषणाचा सारांश सादर केले.
दोन्ही संस्थेच्यावतीने प्रस्ताविक डॉ. तांबोळी व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर यांनी केले .सुत्रसंचालन डॉ.महंमद शेख यांनी केले तर आभार अय्यूब नल्लामंदू यांनी नी मानले .
दुपारच्या परिसंवाद प्राचार्य शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यासत्रात नसीम जमादार कोल्हापुर , हसीब नदाफ , अय्युब नल्लामंदू , तहसीन सय्यद पुणे , निलोफर फणीबंद ,
रजिया जमादार अक्कलकोट हे सहभागी होवून . " स्त्री मुस्लिम मराठी साहित्यिकांची दिशा " या विषयावर आपले विचार प्रकट केले. सुत्र संचालन प्रा. सौ.रईसा मिर्झा यानी केले.
बहारदार झाले कवी संमेलन
मुबारक शेख यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात , साबीर सोलापूरी , साईनाथ राहटकर नांदेड , मोहिदीन नदाफ , शेख जाफर चिखलीकर , अ.हमीद शेख ,
जमील अन्सारी नागपूर , शैंलेंद्र पाटील , कल्याण राऊत , शाहिदा सय्यद , अँड इकबाल शेख , अनिता वलांडे , सय्यद तहसीन (सर्व लातूर ) . रामचंद्र गुरव ,
अॅड रामचंद्र पाचुनकर ( पुणे ) सारिका देशमुख ( उस्मानाबाद ) मोहिदीन नदाफ बार्शी , राणी धनवे मंगळवेढा , सिकंदर मुजावर मोहोळ , इम्तियाज तांबोळी फलटण , जाकीर तांबोळी , सफुरा तांबोळी
(वैराग ) एम. ए. रहीम (चंद्रपुर )
राहुल राजारामपुरे ( इचलकरंजी ) सुमीत हजारे (ठाणे) गौस पाक शेख (पालघर ठाणे ) प्रकाश सनपुरकर , डॉ . रेशमां पाटील , आनंद घोडके ' सोलापुर , गौसपाक मुलाणी ,
सुर्वणा तेली (सांगोला ) शेख चिखलीकर नांदेड , निलोफर फणीबंद , सौ. रजिया जमादार ( अक्कलकोट ) सौ. महमूदा शेख देहू ,
भुपेंद्र आल्हाट ( तळेगांव दाभोडे ) या कवींनी आपल्य रचना सादर करून वाह - वाह मिळविली याचे सुत्र संचालन अँड.उमाकांत आदमाने (पुणे) व कवयित्री नसीमा जमादार यांनी उत्तम रित्या केले .
ॲड. हाशम पटेल लातूर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला यात मुस्लीम कबीर लातूर, कवी शफी बोल्डेकर, जाकीर तांबोळी यांनी आपले विचार व्यक्त केले सुत्रसंचालन खाजाभाई बागवान यांनी केले तर आभार इंतेखाब फराश मानले.
0 Comments