google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. 'सांगोल्याचा पुढचा आमदार मी किंवा शहाजीबापूच; इतरांनी भ्रमात राहू नये'दिपक आबा साळुंखेंचा इशारा कोणाला?

Breaking News

मोठी बातमी.. 'सांगोल्याचा पुढचा आमदार मी किंवा शहाजीबापूच; इतरांनी भ्रमात राहू नये'दिपक आबा साळुंखेंचा इशारा कोणाला?

मोठी बातमी.. 'सांगोल्याचा पुढचा आमदार मी किंवा शहाजीबापूच;


इतरांनी भ्रमात राहू नये'दिपक आबा साळुंखेंचा इशारा कोणाला?

सांगोल्याचा पुढचा आमदार मी किंवा शहाजीबापू पाटील निश्चितपणे असणार आहे. विधानसभा कोणी लढवायची, आमदार कोण असेल, हे आम्ही दोघेच ठरवणार आहोत, 

त्यामुळे इतर कोणीही भ्रंमात राहू नये, असा इशारा माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष 

दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सांगोल्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली होती. साळुंखे आणि शहाजी पाटील यांनी पुन्हा एकदा एकत्र काम करण्याच्या आणाभाका घेतल्या.

 या कार्यक्रमात शहाजी पाटील यांनी सुरुवातीला भाषण केले आणि धमाल उडवून दिली. त्यांच्या त्या विधानाने कार्यक्रमाचा नूरच पालटून गेला.आमदार शहाजीबापू पाटील यांनी 'मी आमदार आहेच. 

दीपकआबालाही आमदार करणार आहे. एक वेळ मी बाजूला सरेन, परंतु आबांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही' असे सुरुवातीलाच बोलून दाखविले. त्यामुळे प्रत्यक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला

 तर मी विधानसभा लढवणारच, असा इशारा देणारे माजी आमदार दीपक साळुंखे यांना हायसे वाटले असेल.

गेल्या काही दिवसांत आमदार शहाजी पाटील व आमदार दीपक साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडासा दुरावा निर्माण झाल्याचे चित्र होते. 

परंतु आजच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये दोघांनीही एकमेकांच्या सुरात सूर मिसळत दोघांपैकी एक आमदार होणार, हे सांगितल्याने कार्यकर्त्यांनी टाळ्याचा कडकडाट केला.

दीपक साळुंखे यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केल्याने दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहींसा दुरावा निर्माण झाला होता. 

मात्र, शहाजीबापूंनी आज दीपक साळुंखे यांच्या वाढदिनी त्यांना आमदार करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे साळुंखे यांची घोषणा प्रत्यक्षात येते 

का हे पहावे लागेल.दरम्यान, सांगोला मतदारसंघ हा माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच मतदारसंघातून गेल्या 

विधानसभा निवडणुकीत गणपतआबांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांना घाम फोडला होता. शहाजी पाटील हे अवघ्या ७०० च्या आसपास मतांनी विजयी झाले होते. 

त्यामुळे पुढच्या निवडणुकीत देशमुख यांच्या विरोधात पाटील लढणार की साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत औत्सुक्य आहे.

Post a Comment

0 Comments