खळबळजनक..सांगोला तालुक्यातील महूद बु येथे चोरी; १ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला चोरट्यांनी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- महुद बु गावातील रिवांडीग वर्कस दुकानाचे पाठीमागील शटर्स उचकाटुन कुलूप तोडुन अज्ञात चोरट्याने १ लाख ३९ हजार रुपये किंमतीच्या रिवांडीग वायर व भुसींग तसेच स्वीटमार्ट दुकानाचे कुलुप तोडून २५ हजार रुपयांचे मुद्देमाल
असा एकूण १ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेली असल्याची घटना २७ जानेवारी २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. चोरीबाबत प्रकाश सरगर यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी प्रकाश सरगर यांचे महुद बु गावात नाथबाबा रिवांडीग वर्कस नावाचे दुकान आहे. दि. २७ जानेवारी रोजी रात्री ०७.३० वा. चे सुमारास दुकानाचे शटर्स बंद करुन वरती
खोलीत गेले होते. दि. २८/०१/२०२४ रोजी पहाटे ०४.३० वा.चे सुमारास झोपेतुन उठुन प्रांत; विधी करता जात
असताना दुकानाचे पाठीमागील शटर्स चे कुलुप तोडल्याचे व शटर्स उचकाटुन वरती केल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेच दुकानामध्ये आत जावुन पाहीले असतादुकानातील साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले होते.
दुकानातील सबमरसेबल वायर, मोनोबॉल्क वायर व बुसिंग ही नसल्याचे दिसले. त्यानंतर गावातील पोलीस पाटील प्रभाकर कांबळे यांना फोन केला व घडलेला प्रकार सांगितला
त्या नंतर त्यांनी येवुन सदर ठिकाणी पाहणी केली. यावेळी चोरट्यांनी ३६ हजार रु किंमतीचे ९० किलो वजनाची पांढ-या रंगाची वायर, ६८ हजार रु किंमतीचे १६० किलो
वजनाची मोनोबॉल्क वायर व ३५ हजार रु किंमतीचे ७० किलो वजनाची पितळी भुसींग असा एकूण १ लाख ३९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळविला.
त्याचप्रमाणे धनराज कापणे यांच्या श्री. समर्थ कृपा स्विटमार्ट हे दुकानाचे कुलूप तोडुन कॉउंटरचे ड्रॉव्हर मधुन रोख २० हजार रुपये तसेच ५ हजार रुपयांचे ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीटते बॉक्स,
सोनपापडी बॉक्स व इतर साहीत्य असे एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


0 Comments