सांगोला तालुक्यात नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांमध्ये लागली स्पर्धा सांगोला शहर झाले डिजीटलमय
सांगोला:- सांगोला शहरांमध्ये सध्या विविध नेत्यांच्या येऊ घातलेल्या वाढदिवसांमुळे संपुर्ण शहर डिजिटल झाले आहे. जिकडे-तिकडे डिजीटल बोर्ड दिसून येत आहेत.
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस येत्या दि. ३ जानेवारी रोजी आहे.
त्यानंतर चार दिवसांनी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांचा वाढदिवस दि. ७ जानेवारी रोजी आहे.
या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते, समर्थक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांचे मोठमोठे डिजीटल बॅनर सांगोला शहरात सर्वत्र लावले आहेत.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांचा परिणाम या डिजीटल बोर्डावरही दिसून येत आहे. आपल्या नेत्यांच्या नावापुढे भावी आमदार, फिक्स आमदार, मिशनः २०२४ आदी मजकूर डिजिटल बोर्डावर लिहिलेले
आगामी निवडणुकांबद्दल व्यूहरचना होत असल्याची चर्चा पुढील वर्षी होणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कोण होणार?
सांगोला तालुक्यातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, हे जरी येणारा काळ ठरवणार असला तरी या राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, समर्थकांनी मात्र आपल्या नेत्याला आत्तापासूनच आमदार ठरवल्याचे यावरुन दिसत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य शहरवासियांतून हे डिजीटल बोर्ड पाहून विविध राजकीय चर्यांना उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहर डिजीटलमय झाल्याचे दिसून येत आहे
आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीसह सर्वच निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस पहायला मिळणार आहे.
0 Comments