google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील एखतपूर येथे पतीच्या खुनातील मुख्य आरोपी पत्नीला उच्च न्यायालयात जामीन

Breaking News

सांगोला तालुक्यातील एखतपूर येथे पतीच्या खुनातील मुख्य आरोपी पत्नीला उच्च न्यायालयात जामीन

 सांगोला तालुक्यातील एखतपूर येथे पतीच्या खुनातील मुख्य आरोपी पत्नीला उच्च न्यायालयात जामीन


सांगोला येथील पतीच्या खुनातील मुख्य आरोपी पत्नी राजाबाई तुकाराम माने हिचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. सांगोला तालुक्यातील एखतपूर येथे ओढ्याच्या

 पात्रामध्ये शिवणे (सांगोला) येथील म्हसोबाच्या माळावर तुकाराम सोपान माने यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला होता. पोलिसांना तपासादरम्यान काही संशयास्पद

 हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी कसून तपास केला असता यातील आरोपी रेश्मा ऊर्फ सविता शिवाजी शेंडगे, सचिन हनुमंत लवटे, प्रदीप ऊर्फ बंटी विलास कांबळे, 

सचिन तुकाराम घोडके, राजाबाई तुकाराम माने या आरोपींविरुब्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

 पोलिसांनी तपास करुन आरोपींविरुब्द पंढरपूर येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आरोपी राजाबाई माने हिचा पंढरपूर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता.

 त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयात आरोपीतर्फे युक्तिवाद करताना आरोपीविरुद कोणताही सकृतदर्शनी पुरावा दोषारोपपत्रामध्ये आढळून आला नाही.

 सदर घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही,. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले नाही. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, न्यायालयात केस न्यायप्रविष्ठ आहे.

 यापुढे आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवणे उचित राहणार नाही, असा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाने आरोपीस २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. 

यात आरोपीतर्फे अॅड. विक्रांत फताटे, अॅड. विशाल वाघेला, अॅड. विजय बेंदगुडे, सरकारतर्फे अॅड. पांडुरंग गायकवाड यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments