google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...आयटी अभियंता तरुणीचा गोळ्या झाडून खून; आरोपीला मुंबईत अटक, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

Breaking News

धक्कादायक प्रकार...आयटी अभियंता तरुणीचा गोळ्या झाडून खून; आरोपीला मुंबईत अटक, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

 धक्कादायक प्रकार...आयटी अभियंता तरुणीचा गोळ्या झाडून खून;


आरोपीला मुंबईत अटक, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय


आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराने गोळ्या झाडून खून केल्याचा प्रकार हिंजवडीतील लक्ष्मी चौकात रविवारी (ता. २८) हा उघडकीस आला. 

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रियकर तरुणास ताब्यात घेतले आहे.वंदना द्विवेदी (रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ निगम (रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषभ निगम हा वंदना हिचा प्रियकर आहे. 

त्याने वंदनाला उशिरा शनिवारी (ता. २७) रात्री लक्ष्मी चौकातील कीर्ती आंगण या परीसरातील ओयो टाऊनहॉस या लॉजवर बोलावून घेत एका रूममध्ये तीच्यावर गोळ्या झाडल्या. यात तिचा मृत्यू झाला. 

याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वंदना ह्या इन्फोसिसमध्ये साँफ्टवेअर इंजिनिअर आहे.

लखनऊ वरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या करून तो मुंबईला पळून जात असताना मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टलसह अटक केली आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, वंदनावर गोळीबार का करण्यात आला, हा प्रकार रात्री नेमका किती वाजता घडला, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments