ब्रेकिंग न्यूज..सोलापूर जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून रुक्मिणी महोत्सव, सीईओ मनिषा आव्हाळे
यांची माहिती; तीन दिवस ‘उमेद’चा उपक्रम; ‘हा’ असणार मुख्य उद्देश
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंर्तगत मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री आज १९ ते २१ जानेवारी दरम्यान
सोलापूर येथील वोरोनोको प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.सदर मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवाचे
उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक- निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर
यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, ‘उमेद’चे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, १९ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता ह.भ.प. संदीप महाराज मोहिते यांचे प्रबोधनपर जुगलबंदी भारुड व २० जानेवारीला सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी यांचे प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
दि.२१ जानेवारीला सकाळी ११ वाजता महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा होतील. महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण २१ जानेवारीला दुपारी २ वाजता होईल.
अभियानाचा ‘हा’ मुख्य उद्देश
या महोत्सवात पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातून ६० स्टॉल लावले जातील. महिला बचत गटांची उत्पादने विक्री, शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळावी म्हणून हा महोत्सव आयोजित केला आहे. यावेळी मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, भरतकाम केलेल्या
साड्या, ज्यूट, लाकडी व चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी अशा वस्तूंचा समावेश आहे.तसेच घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील.
नागरिकांना ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे हे महोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.
0 Comments