धक्कादायक प्रकार... शाळकरी मुलाचा चेहरा दगडाने ठेचून खून
सध्या संपूर्ण राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लातुरमधील उदगीर येथे एका १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
नराधमांनी त्याचा चेहरा दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुमठा येथे एका १४ वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना काल उघडकीस आली.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद घुगे असे मृत मुलाचे नाव आहे.
आपल्या मुलाचा कोणीतरी खून केला, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. १० जानेवारी रोजी संतोष हा घरातून बाहेर गेला, तो नंतर परतलाच नाही. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता.
काल कुमठा शेत शिवारात संतोषचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल चोरल्याच्या संशयावरून संतोषची हत्या करण्यात आली आहे.


0 Comments