google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोला-पंढरपूर महामार्ग चौपदरीकरणाची गरज

Breaking News

मोठी बातमी...सांगोला-पंढरपूर महामार्ग चौपदरीकरणाची गरज

 मोठी बातमी...सांगोला-पंढरपूर महामार्ग चौपदरीकरणाची गरज


सांगोला - पंढरपूर या रस्त्यावरून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सध्या हा रस्ता अपुरा पडत आहे. 

हा रस्ता दोन पदरी असल्यामुळे व वाहनांची संख्या जास्त असल्याने अपघाताचे प्रमाणही सतत वाढत आहे.वारी काळात पायी दिंडी चालल्या की रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे जिकरीचे बनते.

 हा रस्ता चारपदरी व्हावा अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांमधून होत आहे.तीर्थक्षेत्र पंढरपूरला जोडणारे जाण्याचे सर्वच रस्ते नवीन निर्माण झाले आहेत. 

पंढरपूर - सांगोला या दोन पदरी सिमेंट रस्त्याचे काम झाले आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज व विशेषतः कर्नाटक या भागातून नियमितपणे सांगोला - पंढरपूर रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असते. 

पंढरपूरला वारीसाठी येणाऱ्या दिंड्याही या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जातात. दिंड्या जात असताना समोरून व मागून येणाऱ्या वाहनांच्या पुढे जाणे मोठे जिकरीचे काम असते.

 तसेच या रस्त्यावरून अवजड वाहतूकही होत असल्याने व वाहनचालकाच्या बिशिस्तपणामुळे नेहमीच या मार्गावर छोटे-मोठे अपघात सतत घडत असतात. पंढरपूरला जाणार हा मुख्य रस्ता आहे.

सांगली, कोल्हापूर, मिरज व या परिसरातून कर्नाटकाचे येणाऱ्या सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्या या 

सांगोल्यातून पंढरपूरहून सोलापूर व इतर मार्गे जात असतात. या गाड्या मंगळवेढामार्गे जात नाहीत. यामुळे या रस्त्यावर एसटी वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते.

अपघाताची कारणे

हा रस्ता दोन पदरी असून दोनचाकी वाहनांसाठी पांढऱ्या पट्ट्याच्या आतून जाणे गरजेचे असते. परंतु दोनचाकी वाहन चालक बहुतांश वेळेला पांढरा पट्टा सोडून मुख्य रस्त्यावरूनच जाताना दिसतात.

 वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनांना अनेक वेळा या बेशिस्त दोनचाकी वाहनचालकांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी नियमित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक बाबी

सांगोला-पंढरपूर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक रस्त्यावर दुभाजक असल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर नियमित करावी कारवाई 

रस्त्याच्या साईटपट्टीवरील वाहतुकीचे अडथळे दूर करावेत रस्त्यावरून होणारी जड वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी वारीच्या काळात पायी जाणाऱ्या दिंड्यांची विशेष काळजी घेतली जावी

 बॅनर, जाहिरातीचे विविध फलक रस्त्याच्या कडेलाच या रस्त्यावर विविध हॉटेलचे व इतर व्यवसायाचे बोर्ड अगदी रस्त्याच्या जवळ लावण्यात आले आहेत. विविध कार्यक्रमाचे, 

वाढदिवसाचे, नेत्यांच्या आगमनाचे डिजिटल बॅनर रस्त्याच्या अगदी जवळच लावले जातात, यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे बोर्ड काढण्यात यावेत, अशी मागणीही वाहनधारकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments