google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...क्रिकेटची बॅट डोक्यात घालून पत्नीला संपवलं, नंतर दोन मुलांचाही जीव घेतला ठाण्यातून एक धक्कादायक बातमी

Breaking News

खळबळजनक...क्रिकेटची बॅट डोक्यात घालून पत्नीला संपवलं, नंतर दोन मुलांचाही जीव घेतला ठाण्यातून एक धक्कादायक बातमी

  खळबळजनक...क्रिकेटची बॅट डोक्यात घालून पत्नीला संपवलं, नंतर दोन मुलांचाही जीव घेतला ठाण्यातून एक धक्कादायक बातमी


ठाणे : ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून एक व्यक्तीने पत्नी व दोन लहान मुलांची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. आरोपीने क्रिकेटची बॅट डोक्यात घालून आधी पत्नीची हत्या केली.

त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला. टाण्यातील कासारवडवली येथे ही घटना घडली आहे.

अमित धर्मवीर बागडी (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तर भावना बागडी (वय २४) असे मृत पत्नीचे नाव आहे.तसेच सहा वर्षाची मुलगी व आठ वर्षाच्या मुलालाही संपवले. 

अमितने पत्नी व दोन मुलांच्या डोक्यात बॅटने वार वरून त्यांची हत्या केली. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमित बागडी हा मूळचा हरियाणा राज्यातील असून तो ठाण्यात आपल्या भावाकडे राहतो. गेल्या चार ते पाच वर्षापासून कासारवडवली येथे रहात आहे. अमितला दारूचे व्यसन होते

आरोपीचा लहान भाऊ विकास बागडी हा कासारवडवली गावात गेल्या सात वर्षपासून रहात आहे. त्याच्याकडेच अमितचे वास्तव्य होते. दारूच्या व्यसनामुळे त्याचे पत्नीसोबत नेहमी भांडण होत होते. त्यामुळे तो पत्नीपासून विभक्त रहात होता. 

यामुळे भावना नवऱ्याला सोडून लहान दीर विकास बागडी याच्या घरात रहात होती. तीन दिवसापूर्वी मुलांना भेटण्यासाठी आरोपी आला होता. आज सकाळीआरोपीचा भाऊ कामाला गेला व साडे अकराच्या सुमारास घरी परतला.

 तेव्हा त्याला भावना व तिची दोन मुले मृत अवस्थेत आढळून आली. त्यांच्या जवळ रक्ताने भिडलेली क्रिकेटची बॅट पडली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments