सांगोला तालुक्यात शेळ्या व जनावरांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले; चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी
खरवटवाडी येथून तीन शेळ्यांची चोरी
सांगोला/प्रतिनिधी : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहर व तालुक्यात शेळ्या व जनावरांच्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरट्यांनी शेतकऱ्यांची जनावरे चोरण्याचा कहर केला आहे.
पोलिसांनी शेळ्या व जनावरे चोरांचा तपास तातडीने करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
खरवटवाडी येथील सिद्धेश्वर कोंडीबा खडतरे यांच्या २८ हजार रुपये किंमतीच्या तीन शेळ्या शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.
सांगोला शहर व तालुक्यात शेळ्या- मेंढ्या जर्सी गायी, म्हशी, खिलार गायी, आदी जनावरांच्या चोन्यांमध्ये वाढ झाली आहे.
शेताल शेतकरी झोपलेल्याचा फायदा घेऊन चोर चोऱ्याकरीत आहेत. पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून या जनावरे चोरणाऱ्या टोळीला
अटक करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे. यापूर्वी बाळासाहेब भीमराव सावंत यांच्या वासुद हद्दीतून तसेच बनकरवाडी चांडोलेवाडी, कोपटेवस्ती, सावंतवस्ती या परिसरातून मोठ्या प्रमाणावर शेळ्यांच्या व जनावरांच्या चोऱ्या झाल्या आहेत.
त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. आधीच आर्थिक संकटच सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चोऱ्या वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक तसेच आर्थिक धक्के बसत आहेत.
ग्रामीण भागात व शहरात खालील वाड्यावर त्यावरील शेळ्या व जनावरांच्या चोरट्यांचा टोळीचा तपास करून त्यांना अटक करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


0 Comments