google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक... सांगोला एकतपुर रोड मस्के कॉलनी जवळ दुचाकीच्या धडकेत पती ठार, पत्नी जखमी

Breaking News

खळबळजनक... सांगोला एकतपुर रोड मस्के कॉलनी जवळ दुचाकीच्या धडकेत पती ठार, पत्नी जखमी

खळबळजनक... सांगोला एकतपुर रोड मस्के कॉलनी जवळ दुचाकीच्या धडकेत पती ठार, पत्नी जखमी


सांगोला एकतपुर रोड मस्के कॉलनी जवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जखमी होऊन ठार झाला 

तर पाठीमागे बसलेली एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवार, १४ जानेवारी रोजी सायं सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील एखतपूर रोडवरील मस्के कॉलनी येथे घडली.

भारतरत्न सिध्दू वाघमारे (वय ४५) असे अपघातात मृत पावलेल्याचे नाव आहे. तर पत्नी कल्पना भारतरत्न वाघमारे (वय ४०) जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.भारतरत्न वाघमारे शनिवारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास

 सांगोल्यातून भाजी घेऊन एखतपुर रोडने मस्के कॉलनी येथील घराकडे येताना एखतपूरकडून येणारी मोटार सायकल (एम एच ४५. ए. के. १२३) वरील चालक सूरज सुरेश खडतरे (रा. शिवणे ता. सांगोला) याने धडक दिली.

 यामध्ये भारतरत्न सिध्दू वाघमारे यांच्या डोकीस मार लागून उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कल्पना वाघमारे गंभीर जखमी झाल्या आहेत. 

हर्षल वाघमारे यांनी सूरज खडतरे याच्याविरुद्ध मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून भारतरत्न चाघमारे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments