खळबळजनक घटना...आटपाडी तीन अल्पवयीन मुलींवर लॉजवरून घेवून जात लैंगिक अत्याचार; तीन युवकांना अटक
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे.
या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पांडुरंग हणमंत यमगर,
सुभाष यमगर (दोघे रा. बनपुरी, ता. आटपाडी), किरण बाळासाहेब शेंडगे (रा. शेंडगेवाडी, ता. आटपाडी) या युवकांविरूद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित पांडुरंग हणमंत यमगर, सुभाष यमगर व किरण बाळासाहेब शेंडगे यांनी दिनांक २७ डिसेंबर रोजी फिरायला जाऊया असे सांगत सकाळी दहा वाजेच्या सुमारास आटपाडी येथील
कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलवून घेतले. तेथून त्यांना कौठुळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे.
याबाबतचा प्रकार मुलींच्या पालकांना समजल्यानंतरपीडित मुलींना घेऊन आटपाडी पोलिस ठाणे गाठले. संशयित पांडुरंग यमगर, सुभाष यमगर,
किरण शेंडगे यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत.
0 Comments