सांगोला तालुक्यातील नाझरेमठ रोडवर बेलवण नदीवरील
पुलाच्या कठड्याला धडकूलन चोपडीतील दुचाकीस्वार ठार
सांगोला तालुक्यात बेलवण नदीवरील पुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
नामदेव महादेव जवंजाळ (वय ५५, रा.चोपडी, ता.सांगोला) असे मृताचे नाव असून हा अपघात मंगळवार,
१६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.३५ वाजता नाझरे- नाझरेमठ रोडवर बेलवण नदीच्या पुलावर झाला. याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. साळुंखे यांनी पोलिसात खबर दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मृत नामदेव जवंजाळ हे मंगळवारी सकाळी चोपडी गावातून दुचाकीवरून नाझरेमार्गे नाझरे मठ येथे काही कामानिमित्त निघाले होते.
बेलवण नदीच्या पुलावर व्यायाम करणा-या व्यक्तीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली.
या अपघातात जवंजाळ यांच्या डोक्याला मार लागल्याने भाऊ किसन जवंजाळ यांनी त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मुत्यू झाला.


0 Comments