डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा; सहभागी होण्याचे आयोजकांकडून आवाहन
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला) : शेतकरी कामगार पक्षाचे नेते, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त (३ जानेवारी) मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने
निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांना आयोजकांकडून रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले जाणार आहे.
याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या उत्कृष्ठ निबंधाचे जानेवारी महिन्यात पुस्तक प्रकाशित केले जाईल. सदर स्पर्धा विद्यार्थी आणि खुल्या गटात होईल. अशी माहिती आयोजक अॅड. सोमनाथ काळे यांनी दिली आहे.
स्पर्धेसाठी विद्यार्थी गटासाठी राजकारणातील ‘पितामह’, आठवणीतले आबासाहेब आणि गणपतराव देशमुख : राजकारणातला आदर्श हे विषय देण्यात आले आहेत.
तर खुला गटासाठी राजकारणापलीकडे आबासाहेब, आबासाहेब आणि पाण्यासाठीचा संघर्ष आणि सांगोल्याच्या विकासाची सुत विणणारा नेता असे तीन विषय देण्यात आले आहेत.
स्पर्धकांनी आपले निबंध १ जानेवारी पर्यंत लिहून किंवा टाइप करुन sangola1111@gmail.com या मेल आयडी किंवा अॅड. तुकाराम (नाना) ढेरे - ९४२३०६५५८७, अॅड.सोमनाथ काळे - ८५३०००१५५३ या मोबाईल क्रमांकावर पाठवावेत. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments