google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केदार क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या वतीने मोफत सीबीसी-रक्तगट तपासणी संपन्न

Breaking News

केदार क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या वतीने मोफत सीबीसी-रक्तगट तपासणी संपन्न

 केदार क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या वतीने मोफत सीबीसी-रक्तगट तपासणी संपन्न


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील वासुद रोड येथील केदार क्लिनिकल लॅबोरेटरी व केदार हॉस्पिटल यांच्या वतीने 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायकुडे वस्ती, चिंचोली रोड, सांगोला येथील आणि अंगणवाडीच्या  ४८ विद्यार्थ्यांची  व शिक्षकांची मोफत सीबीसी-रक्तगट तपासणी शिबिर संपन्न झाले. 

यावेळी शाळेतील मुलांना निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच स्वतःच्या आरोग्याची निगा कशा पद्धतीने राखली पाहिजे व सकस चांगला

 आहार विहार,योग्य व्यायाम, पुरेशी झोप अश्या चांगल्या सवयी शरीराला लावून आपले शरीर कशा पद्धतीने निरोगी राहील याबाबत  मुलांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ.कुलकर्णी मॅडम , सौ.संस्कृती लवटे मॅडम,जिल्हा परिषद शाळेतील कर्मचारी 

वृंद,अंगणवाडी सेविका, केदार क्लिनिकल लॅबोरेटरीचे श्री. अनिश केदार, श्री.नितीन बंडगर, सौ.रेश्मा खांडेकर, श्री.महेश शिंदे हे सर्व उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments