google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील भीषण अपघातात तीन शिक्षकांसह चार जणांचा मृत्यू !

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील भीषण अपघातात तीन शिक्षकांसह चार जणांचा मृत्यू !

 सोलापूर जिल्ह्यातील भीषण अपघातात तीन शिक्षकांसह चार जणांचा मृत्यू !


 अपघाताची मालिका थांबायचे नाव घेत नसताना आज पुन्हा एक भीषण अपघात घडला असून, तीन शिक्षकांसह चौघांचा मृत्यू एका अपघातात झाल्याचे समोर आले आहे.

काल सोलापूर जिल्ह्यात पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला असल्याने, वाढत्या अपघाताबाबत चिंता व्यक्त होत होती. या अपघातांची चर्चा सुरु असतानाच आज पुन्हा एक  मोठा आणि भीषण अपघात समोर आला आहे. 

काल सहलीच्या बसला अपघात होऊन बावडा येथील एका शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांचा एकाच अपघातात मृत्यू ओढवला आहे. 

एकूण चौघांचा मृत्यू या अपघातात झाला असून तुळजापूर- औसा मार्गावर हा अपघात झाला आहे. ऊसाचा  ट्रॅक्टर आणि कार यांच्यात हा अपघात झाला असून अपघात बळींच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. 

अपघात होताच आजूबाजूचे नागरिक आणि पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले पण चौघांचाही मृत्यू जागेवरच झाला होता त्यामुळे कुणाचा वाचविण्याचा प्रयत्न देखील करता आला नाही.

ऊसाची वाहतूक सुरु झाली की दरवर्षी अनेक निष्पाप लोकांचे बळी जात असतात तरीही ऊस वाहतूक करणारी वाहने आणि त्यांचे चालक शुद्धीवर येत नाहीत 

की पोलीस आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अपघात टाळण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसत नाहीत.  

औसा तालुक्यात घडलेला हा अपघात देखील एवढा भीषण आणि भयानक होता की, कार आणि  ट्रॅक्टरची धडक झाली तेव्हा कारचे इंजिन कारपासून वेगळे झाले आणि तब्बल तीस फुट अंतरावर जाऊन पडले होते.

 या अपघातात बाबा पठान, जयप्रकाश बिराजदार, संजय रणदिवे, राजू बागवान या चौघांचा जागेवर  मृत्यू झाला असून यातील तिघे हे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत.

 या सर्वांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले आणि औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत

 कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला होता. हे जीवघेणे दृष्य पाहून अनेकांचा थरकाप उडत होता.

Post a Comment

0 Comments