google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज....सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक हादरले ! कारवाईचा उगारला बडगा !

Breaking News

ब्रेकिंग न्यूज....सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक हादरले ! कारवाईचा उगारला बडगा !

ब्रेकिंग न्यूज....सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक हादरले ! कारवाईचा उगारला बडगा !


 सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आला असून स्वच्छतेबाबत बेफिकीर असणाऱ्या ग्रामसेवकांची आता खैर नाही असाच इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे. 

ग्रामीण भागात ग्रामसेवक अत्यंत महत्वाचा ठरत असतो परंतु अनेक गावातील ग्रामसेवकाच्या बाबतीत मोठी ओरड असते. 

एक तर हे महाशय गावात थांबायला तयार नसतात. कधी आलेच तर 'पाटी टाकणे' एवढेच त्याला माहित असते.

 त्याच्या या उदासीन धोरणामुळे गावकरी अस्वस्थ असतात. सार्वजनिक स्वच्छता किती महत्वाची असते हे यांना कुणीतरी समजावून सांगण्याची आवश्यकता आहे 

आणि आता हेच काम त्यांच्या वारीस्थानी हाती घेतले आहे. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन याबाबत ग्रामसेवक लक्षपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा काही गावात मोठा अनुभव आहे. 

पण आता अशा ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निध स्वच्छ भारत मिशन शी लिंक करण्यात आलेला असून,  

 सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांची नोंद सेवा पुस्तकात घेणार असल्याचा इशारा सीईओ आव्हाळे यांनी दिला आहे. 

शौचालयांची कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांना यापूर्वी दोनवेळा लेखी नोटीस दिली असून आता एक जरी शौचालय मागे राहिल्यास संबंधित ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली जाणार आहे.

शौचालयांची कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांना यापूर्वी दोनवेळा लेखी नोटीस दिली असून आता एक जरी शौचालय मागे राहिल्यास संबंधित ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली जाणार आहे.

‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) या योजनेंतर्गत गावात सार्वजनिक शौचालयाची बांधकामे तसेच वैयक्तिक शौचालय, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. 

यासाठी स्वच्छता अभियान राबवले जात असताना, अजून अनेक गावात ही मोहीम पोहोचलीच नसल्याचे दिसत 

असून, यास ग्रामसेवक जबाबदार आहेत. ३० ऑक्टोबरपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे तरीही अनेक गावात सांडपाण्याची गटारगंगा तुंबलेलीच आहे. 

डुकरे मोकाट फिरत आहेत तर कचऱ्याचे ढीग जागोजागी उभे असल्याचे दिसत आहे.  केंद्र शासनाच्या सूचनांनुसार ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत हागणदारी मुक्त गावाचे ध्येय साध्य करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

 ग्रामसेवकांची मोठी भूमिका असतानाही अनेकांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून या मंडळीना वठणीवर आणण्याचे काम आता सुरु झाले आहे.

गावातील ज्या घरात शौचालय बांधण्यात आलेले नाही अशा कुटुंबाची यादी तयार करून त्यांना शौचालय बांधकामाचा लाभ देण्यात येणार आहे. सांडपाणी हे लोकांच्या आरोग्यावर संकट आले आहे.

 या सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असून, या व्यवस्थापनासाठी वैयक्तिक शोषखड्डे घेण्यावर भर देण्याचे देखील सांगण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन देखील आवश्यक करण्यात आले आहे. 

चाळीस दिवसात गावे शाश्वत स्वच्छ केली जावीत असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिले आहेत. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीत २२ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार 

असून, शौचालयाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार १ जानेवारीपासून गावातील एकही कुटुंब उघड्यावर शोचास जाणार नाही यासाठी नेमके नियोजन करण्यात येणार आहे. 

‘हागणदारी मुक्त गाव’साठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत २२ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा होणार आहे.

 यावेळी नव्याने शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावास मान्यता देणे, तसेच शौचालय बांधकामासाठी प्रबोधन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात करणे, ३१ डिसेंबरपूर्वी शौचालय बांधकाम होण्याच्या अनुषंगाने आवश्यक

 त्या उपाययोजना करणे, १ जानेवारी २०२४ नंतर गावात एकही कुटुंब उघड्यावर शौचास जाणार नाही, यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्यासंदर्भातील नियोजन होईल.

 ‘हागणदारीमुक्त अधिक’साठी लागणारे ठराव, व्हिडिओ चित्रीकरण यासंदर्भातही या ग्रामसभेत ठराव अपेक्षित आहेत. पाणी आणि स्वच्छता मिशन विभागाकडून सगळ्याच गावांची पडताळणी देखील केली जाणार

 असून हागणदारी मुक्त गाव बनविण्यासाठी प्रभावी नियोजन केलेजाणार आहे. गावाच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने चाळीस दिवसाचे हे अभियान असून त्यासाठी गावकरी मंडळींचेही सहकार्य अपेक्षित आहे. 

 शौचालयाचे बांधकाम सर्व दृष्टीने योग्य असायला हवे आणि ते काम योग्य पद्धतीने होते आहे की नाही याची खतरे ग्रामसेवक तसेच विविध स्तरावरील तांत्रिक अधिकारी, शाखा विस्तार, विस्ताराधिकारी, तालुका समन्वयक व समूह समन्वयक यांनी करायची आहे.

Post a Comment

0 Comments