google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला वनविभागाकडून अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक, अवैध चराई करणाऱ्यावर कारवाई; ५ लाखांचा दंड वसुल

Breaking News

सांगोला वनविभागाकडून अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक, अवैध चराई करणाऱ्यावर कारवाई; ५ लाखांचा दंड वसुल

 सांगोला वनविभागाकडून अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक, अवैध चराई करणाऱ्यावर कारवाई; ५ लाखांचा दंड वसुल


सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला वनविभागाकडून अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध चराई करणान्यावर दंडात्मक कारवाई करून पाच लाख रुपयांचा शासकिय भरणा केला

 असल्याची माहिती करपरिक्षेत्र अधिकारी टी. व्ही. जाधव यांनी दिली. सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारीबांनी उपवनसंरक्षक श्री धैर्यशील पाटील सहा बनसंरक्षक श्री.बी. जी. हाके साहेबांच्या मार्गद‌र्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईमध्ये अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध चराई इ. सांगोला तालुक्यात होत असल्याने दंडात्मक कारवाई करून पाच लाख रुपयांचा भराणा स्टेट बैंक ऑफ इंडिया सांगोला येथे केला आहे.

 त्यामुळे अवैध वृक्षतोड करणारे व्यापारी, आहागिरणीधारक, अवैध चराई करणारे व्यक्ती यांचे धाबे दणाणले आहेत.

 वनविभाग सांगोला कार्यालयाकडून  परवाना घेवून त्यानंतर वर्क्षतोड करावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले. तसेच वारस कोळसा पोती ३०० जम केली आहेत. त्याचा लिलाव लवकरच होणार असून त्या रकमेचा शासकिय भरणा करणार आहे

 असे वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी सांगितले आहे, दंडात्मक कारवाई केल्यामुळे अवैध वृक्षतोड बंद झाली असून एका दिवसाला पाचशे झाडे वाचत आहेत

वरील कारबाई वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तु. वि. जाधवर, वनपाल सांगोला श्री. एस. एल. मुंढे, बनपाल जुरोनी श्री एस. एल. वाघमोडे, श्रीम. ए आर, पिरजादे, वनरक्षक सांगोला श्री. जी. बी. व्हस्कटे, बनरक्षक अचकदाणी श्रीम.व्ही. पी. इंगोले, 

वनरक्षक कटफळ श्री. आर. व्ही. कवठाळे, नरक्षक महुद श्री. के. एन. जगताप, वनरक्षक घेरडी श्री. एस. एस. मुद्दे, वनरक्षक ह. मंगेवाड़ी की, ए. के. करांडे, वनरक्षक कोळा श्रीम, एम. आर. श्रीमंगले व चनमजूर यांनी कार्यवाही केली.

Post a Comment

0 Comments