नीरा देवघर प्रकल्पासाठी 3592 कोटी, सांगोलासह इतरही तालुक्यांना याचा फायदा होणार देशातील हा पहिला प्रयोग
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने महाराष्ट्रातील नीरा देवघर प्रकल्पासाठी 3592 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशाकीय मान्यता दिली आहे.
ज्यात आता केंद्र सरकार आपला 60 टक्के हिस्सा म्हणजे 2340 कोटी रुपये पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेतून देणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंद पाईपलाईनद्वारे 14 टीएमसी पाणी दिले जाणार आहे.
देशातील हा पहिला प्रयोग
आजवर कालव्याने पाणी देताना मोठ्याप्रमाणात पाण्याचा अपव्यव होत असे. त्यामुळे या योजनेतून सूक्ष्म सिंचन व बंदिस्त पाईपलाईनद्वारे
सिंचनाचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणले जाणार असल्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे देशातील हा पहिला प्रयोग असणार आहे.
'या' भागांना होणार फायदा
या प्रकल्पासाठी राज्य सरकार 40 टक्के आणि केंद्र सरकार 60 टक्के खर्चाचा भार उचलणार असून, राज्य सरकारने यासाठी यापूर्वीच 500 कोटी रुपये दिले आहेत.
या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर या भागाला मोठा फायदा होणार आहे.



0 Comments