सांगोला नगरपरिषदेचा भोंगळ कारभार ; ऐन दिवाळीत गेल्या ३ दिवसापासून
शहराचा पाणीपुरवठा बंद ; नागरिकांचा संताप अनावर
तालुका प्रतिनिधी ; ऐन दिवाळीच्या काळात सांगोला शहरातील नागरिकांना दिवसेंदिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नगर परिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत
नसल्याने सांगोला नगरपालिकेचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसापासून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा झालेला नाही.
याबाबत आजी-माजी लोकप्रतिनिधी व येणारा काळात भावी नगरसेवक म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यानी या नगरपालिकेच्या सुरू असलेल्या
गलथान कारबाराबाबत तातडीने जाब विचारून नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून न.पा. प्रशासनाच्या या कारभाराचा तातडीने निषेध करणे आवश्यक आहे.
परंतु सांगोला शहरातील कोणताही आजी - माजी लोकप्रतिनिधी किंवा माजी नगराध्यक्ष , नगरसेवक व भावी नगराध्यक्ष ,नगरसेवक यांनी गेल्या ३ दिवसात कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही.
त्यामुळे." आंधळं दळतं आणि कुत्रे पिठ खातं "अशी अवस्था झालेल्या नगरपालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे फावले आहे. त्वरित शहराचा पाणीपुरवठा सुरळीत
न केल्यास उद्या शनिवार दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११; ०० सांगोला नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सांगोला शहरातील नागरिकांनी दिला आहे.
0 Comments