आनंदाची बातमी..अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर महापालिकेत २२६ पदांची भरती
सोलापूर महापालिकेत अत्यावश्यक सेवेतील वर्ग १ ते ४ मधील एकूण ૨૨૬ पदांची गेल्या अनेक वर्षानंतर भरती होत आहे.
सोलापूर महानगरपालिके च्या आस्थापनेवरील रिक्त असणारी ૨૨૬ पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दिवाळीच्या निमित्त महापालिका प्रशासनाकडून या मेगा भरतीचा धमाका उडविण्यात आला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-अ (अराजपत्रित) ते गट ड अ- मधील विविध २६ संवर्गाकरिता जागा भरण्यात येत आहेत. प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहीरात देण्यात आली आहे.
विविध पदांसाठी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत. www. solapurcorporation.gov.in या संकेत स्थळावर सुध्दा ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.
या जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालील प्रमाणे आहे. विविध पदांची माहिती तसेच त्यांची वेतनश्रेणी आदींची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी जाहीर
प्रसिध्दीकरणाद्वारे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून बिंदू नामावली मंजुरीसह या रिक्त पद भरती संदर्भात आवश्यक ती तयारी महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली केली.
ही भरती प्रक्रिया शासन आदेशानुसार टीसीएस या कंपनीच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे नेटके नियोजन केले आहे. सोलापूर महापालिकेकडील आकृतीबंधनुसार एकूण ४६१२ इतकी मंजूर
असून, त्यापैकी ११७२ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांपैकी सरळसेवेने भरती करावयाची १००१ इतकी पदे रिक्त आहेत. यामध्ये विविध एकाकीपदे तसेच अग्निशामक, आरोग्य, पाणीपुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवेतील
वर्ग १ ते वर्ग ४ मधील पदांचा समावेश आहे. प्रशासकीय कामकाज सुरळीत व प्रभावीपणे राबविण्या करीता तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने ३४० पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली.
दरम्यान, यातील मानधनावरील कनिष्ठ अभियंता व इतर पदांवरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने ही काही पदे या भरतीतून वगळले आहेत. त्यामुळे अखेर एकूण विविध २२६ पदांची भरती प्रक्रिय राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
👇या पदांची होणार भरतीः
पर्यावरण संवर्धन अधिकारी (१), मुख्य अग्निशामक अधिकारी / अधिक्षक अग्निशामक दल (१), पशू शल्य चिकीत्सक/ पशू वैद्यकीय अधिकारी (१), उद्यान अधिक्षक (१), क्रीडाधिकारी (१), जीवशास्त्रज्ञ (१), महिला व बालविकास अधिकारी (१), समाज विकास अधिकारी (१), कनिष्ठ अभियंता - आर्किटेक्चर
(१), कनिष्ठ अभियंता आटोमोबाईल (१), कनिष्ठ अभियंता - - विदयुत ( ५ ), सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी (१), सहाय्यक उद्यान अधिक्षक (१), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन - २), आरोग्य निरीक्षक (१०), स्टेनो टायपिस्ट (२), मिडवाईफ (५०), नेटवर्क इंजिनियर
(१), अनुरेखक ट्रेसर (२), सहाय्यक - प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१), फायर मोटार मेकॅनिक (१), कनिष्ठ श्रेणी लिपीक (७०), पाईप फिटर व फिल्टर फिटर (१०), पंप ऑपरेटर (२०), सुरक्षारक्षक (५), फायरमन (३५) अशी एकूण २२६ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
0 Comments