सांगोला न.पा.सांगोला यांचेकडील कोंडवाडयामध्ये गेले चार दिवसापासून जनावरे डांबून ठेवून त्यांना चारा पाणी
न दिल्याने एक जनावराचा मृत्यू झाले असुन त्याचे पोस्ट मार्टम करून संबंधीतावर कारवाई होणेबाबत..
सांगोला :- श्री. विनोद विक्रम बनसोडे रा. मिमनगर, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर
न.पा. सांगोला यांचेकडील कोंडवाडयामध्ये गेले चार दिवसापासून जनावरे डांबून ठेवून त्यांना चारा पाणी न दिल्याने एक जनावराचा मृत्यू झाले असुन त्याचे पोस्ट मार्टम करून संबंधीतावर कारवाई होणेबाबत..
माझी दोन जनावरे न.पा. सांगोला प्रशासनाने कोंडवाडयात टाकली होती. सदर जनावरांचा दंड भरुन जनावरे घेवून जाण्यास सांगितले. मी दंड भरण्यास तयार असताना मला वाढीव रक्कम मागितली त्यामुळे मी जनावरे घेवून गेलो नाही. परंतू सदर जनावरे कोंडवाडयात असताना त्यांनी जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा पाणी दिला गेला नाही. त्यामुळे एका जनावराचा मृत्यू झाल आहे.
तरी सदर मयत जनावरांचे पोस्ट मार्टम होवून संबंधीतावर कायदेशिर कारवाई करावी, ही विनंती. अन्यथा मला अंदोलनाशिवाय पर्याय नाही.


0 Comments