google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात रब्बी हंगाम २०२३ पीक स्पर्धेचे आयोजन - कृषी अधिकारी शिंदे ३१ डिसेंबर अखेर अर्ज करण्याचे आवाहन

Breaking News

सांगोला तालुक्यात रब्बी हंगाम २०२३ पीक स्पर्धेचे आयोजन - कृषी अधिकारी शिंदे ३१ डिसेंबर अखेर अर्ज करण्याचे आवाहन

 सांगोला तालुक्यात रब्बी हंगाम २०२३ पीक स्पर्धेचे आयोजन -


कृषी अधिकारी शिंदे ३१ डिसेंबर अखेर अर्ज करण्याचे आवाहन

सांगोला - कृषी विभागांमार्फत रब्बी हंगाम - २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासांठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पीकस्पर्धेचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील. पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम दि.३१ डिसेंबर २०२३ असल्याचे कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात वउत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत 

प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोवल ग्रामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात चाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी 

पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम २०२३ पासून पिकस्पर्धा राबविण्यात येणारआहे.स्पर्धेचे पात्रता निकष

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नांवे जमीन असंणे व ती जमीन तो स्वतः कसत असंणे आवश्यक आहे.

 स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

 स्पर्धेसाठी प्रवेश शुक्ल पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. ३०० व आदीवासी गटासाठी रक्कम रुपये १५० असे असणार आहे. बक्षिसस्वरुप तालुका स्तरावर - प्रथम-

रु. ५०००/-, द्वितीय - रु. ३०००/-, तृतीय -रु. २०००/ - तर जिल्हास्तरावर - प्रथम-रु. १००००/-, द्वितीय -रु. ७०००/ -, तृतीय -रु. ५०००/- व राज्यस्तरावर - प्रथम-रु. ५००००/ -, द्वितीय -रु. ४००००/-, तृतीय -रु. ३००००/- असे असणार आहे.

 अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www. krishi. maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments