शहीद अशोक कामटे संघटनेच्या किल्ला स्पर्धांचे रविवारी बक्षीस वितरण.
सांगोला (प्रतिनिधी) (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे भव्य किल्ला बांधणी, सजावट स्पर्धांचे 2023 आयोजन करण्यात आले होते.
दीपावली सुट्टीत लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शहरातील असंख्य स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग सहभाग नोंदविला.
या भव्य किल्ले स्पर्धांचे बक्षीस वितरण शहीद दिनी रविवार दि 26 /11/ 2023 रोजी दुपारी चार वाजता सन्मानचिन्ह ,बक्षीस देऊन स्पर्धकांना गौरवण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास सर्व सहभागी स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे.
बक्षीस वितरणाचे ठिकाण विटा बँकेसमोर ,स्टेशन रोड सांगोला या ठिकाणी होणार असल्याची माहिती शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आली.


0 Comments