सांगोला तालुक्यात ९ गावांत आढळल्या ४९ कुणबी नोंदी - तहसीलदार मा. संतोष कणसे
सांगोला:- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला ) : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्यातील नऊ गावांतील मोडीतील ८ लाख ७३ हजार १०३ पानांच्या केलेल्या
तपासणी नोंदीत जन्म मृत्यू नोंद वहीतून तपासण्यात आलेल्या दोन लाख ९३ हजार ५४२ नोंदीतून ४१ कुणबी नोंदी सापडले आहेत.
यापैकी चार नोंदी मराठी भाषेतून तर ३७ नोंदी मोडी लिपीतून मिळाल्या असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.
मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सांगोला तहसील कार्यालयातील अभिलेखामध्ये ६ नोव्हेंबरपासून नायब तहसीलदार, लिपिक,
मंडल अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्यामार्फत १० महसूल मंडलातील सन १९६७ पूर्वीचे मोडीतील विविध प्रकारच्या नोंदी, दस्तऐवज कागदपत्राची तपासणी चालु आहे.
आत्तापर्यंत १७ नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ९ गावांतून एखतपूर, पाचेगाव बू.. चिकमहद, मेथवडे, राजापूर, वाढेगाव, चोपडी, वाटंबरे व संगेवाडी या गावातील ३७ हजार २८ कागदपत्रांची तपासणी केली असता यामध्ये ४१ कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
यामध्ये चिकमहृद गावातील २ हजार ५२१ कागदपत्रातून मराठी भाषेतील एक तर मोडी लिपीतून चार अशा एकूण पाच नोंदी सापडल्या आहेत.
मेथवडे गावातून ३ हजार ९०० कागदपत्र तपासणीतून मराठी भाषेतील एक तर मोडी लिपीतील पाच अशा एकूण सहा नोंदी सापडल्या आहेत.
एखतपुर गावामध्ये ३ हजार ३४२ कागदपत्रे तपासणीतून मराठी भाषेतील दोन तर मोडी लिपीतील तीन अशा एकूण पाच कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
पाचेगाव बटुक गावातील २ हजार ७३३ कागदपत्र तपासणीतून सर्वाधिक मोडी भाषेतील नऊ नोंदी सापडल्या आहेत. वाढेगावमध्ये ४ हजार ६१८ कागदपत्रांपैकी मोडी भाषेतील एक नोंद सापडली आहे.
राजापूर मध्ये १ हजार ८०५ कागदपत्रे तपासणीतून मोडी भाषेतील एक नोंद सापडली आहे. चोपडी गावात ५ हजार १३९ कागदपत्रे तपासणीतून मोडी भाषेतील एक नोंद सापडली आहे.
वाटंबरेमध्ये ६ हजार १४ कागदपत्रांमधून मोडी भाषेतील सहा नोंदी सापडल्या आहेत. संगेवाडी गावातून ६ हजार ९५६ कागदरते तपासणीतून मोडी भाषेतील सात नोंदी आढळ्त आल्या आहेत.
सन १९४८ ते १९६७ व १९४८ पूर्वी अशा दोन टप्यांमधून कुणबी कागदपत्रांच्या नोंदी सध्या तपासल्या जात आहेत. तालुक्यात सापडलेल्या ४१ नोंदी या सन १९३९ पूर्वीच्या कागदपत्रातून मिळाल्या आहेत.
या अभिलेख तपासणी मोहिमेत नायब तहसिलदार, २ लिपिक, १० मंडल अधिकारी, ४२ तलाठी व १० कोतवाल असे ६५ अधिकारी कर्मचारी मिळून या दस्तऐवजाची तपासणी करून पुरावे शोधले जात आहेत.
अजूनही मराठी, उर्दू, फारसी, कन्नड आणि मोडी भाषेतून कुणबी पुरावे शोधण्याचे कामकाज सुरू आहे
संतोष कणसे, तहसीलदार, सांगोला


0 Comments