ब्रेकिंग न्यूज...वाणीचिंचाळे गावाचे माजी सरपंच शंकर संदिपान गडहिरे यांचे निधन.
सांगोला प्रतिनिधी, वाणीचिंचाळे गावाचे माजी सरपंच शंकर गडहिरे यांचे अपघाती निधन झाले. दोन मोटारसायकलचा वळणावर समोरासमोर धडक होऊन अपघातात जखमी झाले होते.
उपचारासाठी सांगली जिल्ह्यातील विवेकानंद हाँस्पीटलमध्ये नेले होते.यावेळी ते मृत्युमुखी पडले.
त्यांच्या पश्चात पत्नी ,मुले, भाऊ असा परिवार आहे.
माजी सरपंच शंकर गडहिरे हे कायम गावातील प्रत्येक कामात हिरिरीने सहभाग घेवून सर्वाना मार्गदर्शन करत होते. गावातील प्रत्येक लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत असणाऱ्य लोकांच्य मध्ये त्यांच्या विषयी एक आपुलकी होती.
तात्यांचा हा अर्धवट प्रवास तरूण पिढीला घातक ठरणार आहे कारण ते नेहमीच तरूणांना अर्थिक, सामाजिक कार्यात काम करत असताना कशा पद्धतीने वागले पाहिजे यांचे नेहमी मार्गदर्शन करत असतं.
वाणिचिंचाळे गावच्या या लोकप्रिय व्यक्तीमत्वास लोकशक्ती न्युज नेटवर्क परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धाजली ...
0 Comments