मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे श्री अंबिकादेवी मंदिरामध्ये दिवाळी निमित्त
दीपोत्सवाचे आयोजन; नागरिकांनी सहभागी होण्याचे आयोजकांकडून आवाहन
दिवाळी सणाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मागील काही वर्षात नैसर्गिक संकटांना सामोरं गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण एकत्रितपणे उत्साहात दिवाळी साजरी करतो आहोत.
दिवाळी सणाच्या निमित्ताने सांगोला शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री अंबिका देवी मंदिर येथे यंदा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानाच्या पुढाकारातून "सांगोला दीपोत्सव २०२३" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. त्यानिमित्ताने आपण आपल्या घरी, परिसरात दिव्याची रोषणाई करत असतोच. पण सामूहिकपणे सर्वांच्या सहभागातून रोषणाई करण्यात यावी.
यासाठी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे.
दीपोत्सव नक्की कधी ?
दिवाळी पाडवाच्या मुहूर्तावर मंगळवारी दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० वेळी सांगोला शहरातील ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिर, विद्यामंदिर प्रशालेजवळ, सांगोला येथे दीपोत्सव आयोजित आहे.
कार्यक्रमस्थळी दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक दिवे आयॊजकांकडून आणले जाणार आहेत.
याशिवाय आपणही आपले दिवे घेऊन यात सहभागी होऊ शकता. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
0 Comments