google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार....आधी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मग दिले सिगरेटचे चटके त्यानंतर तिचे केले मुंडण

Breaking News

धक्कादायक प्रकार....आधी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मग दिले सिगरेटचे चटके त्यानंतर तिचे केले मुंडण

 धक्कादायक प्रकार....आधी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मग दिले सिगरेटचे चटके त्यानंतर तिचे केले मुंडण


 “तिच्यावर बलात्कार केल्यावर आरोपींनी तिच्या शरीरावर सिगारेटने जखमा केल्या 

त्यानंतर तिचे मुंडन करायला करून पुन्हा परिसरातील स्मशानभूमीजवळ नेत बालिकेला सर्वांसमक्ष विवस्त्र करीत बलात्काराचा प्रयत्न केला

आरोपी हा गुड प्रवृतीचा असून त्यावर बरेच गुन्हे दाखल देखील आहेत वंचित बहुजन महिला आघाडी पदाधिकारीमुळेच मातंग समाजातील 14 वर्षीय पिडीत मुलीला मिळाला न्याय आरोपीस अटक करून गुन्हे दाखल

अकोला शहरातील मंदवलेला गुन्हेगारीचा आलेख पुन्हा वर चढला असून आरोपींना पोलिसांची भीती राहिली नसल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत असल्याने कायदा व सुव्यवस्था कुठे तरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

अकोला शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलीवर याचं परिसरात राहणाऱ्या एका नराधम तरुणाने चाकूचा धाक दाखवून वारंवार अत्याचार केला. खदान भागात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणानं १४ वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. 

शरीरावर अनेक ठिकाणी सिगारेटचे चटके युवकानं ब्लेडने तिचे केसही कापले.  एवढ्यावरच समाधान न झाल्यानं त्यानं तिला सलूनमध्ये नेलं.

 तिचे मुंडन करायला लावलं. पुन्हा परिसरातील स्मशानभूमीजवळ नेत बालिकेला सर्वांसमक्ष विवस्त्र करीत बलात्काराचा प्रयत्न केला. या घटनेमुळं अकोला शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 मुलीची अवस्था पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीतील महिलांनी खदान पोलिस ठाण्यात ठिय्या दिला व आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली. तणाव वाढल्यानं परिसरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

शहरातील खदान पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंदे चालत असल्याचे प्रकार लोकांच्या सतर्कतेने उघड होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच बिनबोभाट सुरू असलेल्या कुंटणखाना येथे देहविक्रय करणाऱ्या आणि

 महीला एजंटला स्थानीक रहिवाशी नागरिकांनी पिटाळून लावले आहे. हा प्रकार लोकांच्या विस्मरणातून जात नाही तोच आज १४ वर्षीय पीडितेचे वडील मोलमजुरी करण्यासाठीं जात

 असताना पाहून वेळेची संधी साधत आरोपीने अमानवीय कृत्य केल्याची बाब उघड झाली काय आहे नेमके प्रकरण ?

आरोपी गणेश कुंभरे (वय २९) असे आरोपीचे नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पीडित मुलीचे पालक मजुरी करतात. गणेशने पीडित मुलीला १५ नोव्हेंबरला मारहाण करीत आपल्या घरी नेले. मुलीला सिगारेटचे चटके देत

 त्यानं तिच्यावर अनेकदा बळजबरी केली. मुलीनं विरोध केल्यानं संतापाच्या भरात गणेशने ब्लेडच्या साह्यानं मुलीचे केसंही कापले. त्यानंतर त्याने तिला पुन्हा मारहाण केली. 

कुणाला कळेल या भीतीनं गणेशने पीडितेला सिंधी कॅम्पमधील एका सलूनमध्ये नेलं. घरात वाद झाल्यानं तिनेच केस कापून घेतले, त्यामुळे तिचं मुंडन करून देण्यास गणेशनं सलूनवाल्यास सांगितलं.

 मुंडन करून घेतल्यानंतर गणेशने तिला पुन्हा परिसरातील स्मशानभूमीजवळ आणलं व सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करीत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मारहाणही केली. 

या वेळी परिसरातील चार युवकांनी गणेशला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड केल्यानं गणेश पळुन गेला. मात्र कुणालाही हा प्रकार सांगितल्यास परिवाराला जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली.

याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या प्रकारानंतर पीडिता घाबरली तिने याची वाच्यता कुणाकडे केली नाही. 

याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने पीडितेचं वारंवार लैगिंक शोषण केलं. आरोपी हे कृत्य वारंवार करत असताना कुणीही हटकत नसल्याचे पाहून आरोपी निर्ढावला आणि त्या आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिले.

 आरोपीने पीडितेचे केस देखील कापले. दिवसेंदिवस आरोपीचं कृत्य वाढत असल्याने पीडितेने या प्रकाराची वास्तव माहिती आई-वडिलांना दिली. 

मुलीवर बलात्कार झाल्याचं कळताच आई वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या.

शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरापर्यंत अरुधती शिरसाट, प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगळे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, वंदना वासनिक, आशिष मांगुळकर, सचिन शिराळे आदी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. 

त्यामुळे खदान भागातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिसांनी गणेशला तातडीनं बेड्या ठोकत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला करत त्याला कोर्टा समोर हजर केले

 असता कोर्टाने या नराधमाला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरात झालेला हा प्रकार अमानवीय असून या कृत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली तर अनेकांनी यावर संताप व्यक्त देखील केला जात आहे.

Post a Comment

0 Comments