धक्कादायक प्रकार..दारुच्या नशेत तरुणाने ब्लेडने कापून घेतला गळा सोलापूर जिल्ह्यातील घटना..
सोलापूर :- दारुच्या नशेमध्ये एका तरुणानं ब्लेडनं गळ्यास कापून घेण्याचा प्रकार शहरातील लष्कर परिरसरात दुपारी 1:30 च्या सुमारास घडुला.
यलप्पा नरसप्पा भंडारे (वय 30, सरस्वती चौक, लष्कर सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
यातील तरुणाला दारुचे व्यसन असल्याने नशेमध्ये त्यांने राहत्या घरी ब्लेड हाती घेऊन गळ्यावर मारुन घेतली.यात रक्तबंबाळ झाला.
दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर नातलगांनी धावाधान केली. भाचा गणेश म्हेत्रे याने तातडीने येथील शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले.
येथे त्याला ॲडमिट करुन घेऊन उपचार सुरु करण्यात आले. तो शुद्धीवर असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सिव्हील पोलीस चौकीमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


0 Comments