google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान... खासगी वाहनावर 'पोलिस' लिहिल्यास पाचशे, तर दुसऱ्यावेळी दीड हजार दंड नियम कागदावरच : वाहनचालकांकडून सर्रास होतेय उल्लंघन

Breaking News

सावधान... खासगी वाहनावर 'पोलिस' लिहिल्यास पाचशे, तर दुसऱ्यावेळी दीड हजार दंड नियम कागदावरच : वाहनचालकांकडून सर्रास होतेय उल्लंघन

 सावधान... खासगी वाहनावर 'पोलिस' लिहिल्यास पाचशे, तर दुसऱ्यावेळी दीड हजार दंड


नियम कागदावरच : वाहनचालकांकडून सर्रास होतेय उल्लंघन

शहरात अनेक ठिकाणी आपल्याला खासगी वाहनांवर पोलिस, डॉक्टर, वकील, महाराष्ट्र शासन असे मोठ्या अक्षरात लिहिलेले दिसत असले तरी आपल्याला माहीत आहे का?

 अशाप्रकारे वाहनांवर पाटया लावणे किंवा लिहिणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

नाशकात अनेक खासगी वाहनांवर पोलिस, डॉक्टर, वकील, महाराष्ट्र शासन असे लिहिले वाहने आढळून येतात.

• नियमांनुसार नॉन-द्वान्सपोर्ट वाहनावर शब्द, आकृती, चित्र, चिकटवलेले (पोलिस, डॉक्टर, अॅडव्होकेट इत्यादी) वापर करण्यास महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार बंदी आहे.

 एखाद्या वाहनांवर पहिल्या वेळेस असे आढळल्यानंतर कारवाई करताना ५०० रुपये तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर पकडल्यास १५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येती.

• प्रत्यक्षात अशी कारवाई अपवादानेच केली जात असल्याने मोटारींवर सर्रास असे फलक दिसतात. शहरात अनेक वाहनचालकाकडून वाहनांवर पोलिस, डॉक्टर, वकील, महाराष्ट्र शासन

, भारत सरकार असे लिहिलेल्या पाटबा अधिकारी कर्मचारी यांना घाबरविण्यासाठी किवा आपला ठसा उमटविण्यासाठी मुद्दामपणे ठेवल्या जात असल्याचे पाहावयास मिळते.

Post a Comment

0 Comments