आनंदाची बातमी.... रेशन दुकानात आता सण-उत्सवाला आनंदाचा शिधासोबत मिळणार मोफत साडी
रेशन दुकानावर अन्नधान्यांबरोबरच आता साडीही मिळणार आहे. सण उत्सवानिमित्त राशन दुकानात चक्क मोफत साडी मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.
ठराविक सण-उत्सवानिमित्त साडीचे वाटप केले जाणार आहे. वस्त्रोद्योग विभागाकडून वर्षाला एक साडी मोफत मिळणार आहे.
राज्य सरकारकडून गुढी पाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळीनिमित्त रेशन दुकानातून 'आनंदाचा शिधा' दिला जातो.
यामध्ये डाळी, तेल त्याचबरोबर अन्य जिन्नस असतात. त्यातच आला निश्चित केलेल्या सणाच्याला दरवर्षी एक साडी राशन कार्ड धारकांना दिली जाणार आहे.
राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंत्योदय कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे.
आंनदाचा शिधा या संचात १ किलो साखर, १ लीटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा दिला जातो. १०० रुपयात हा आनंदाचा शिधा दिला जातो.


0 Comments