सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठ्यांना दाखले देण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना;
प्रत्येक तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
मराठा समाजाला कुणबीच्या प्रमाणपत्रावरून ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने सहायता कक्ष स्थापन करण्यात यावा.
मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने दाखले वितरीत करण्यात आले त्यांच धरतींवर काम करावे अशा सूचना मंत्र्यालयातून येतान जिल्हाधिकारी कार्यालयात मराठ्यांना दाखले देण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी ऑनलाईन प्रणालीने मंत्रालयातून संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचे वितरीत करण्यासाठी दाखले १२ प्रकारच्या पुराव्यांची तपासणी करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये देखिल पुराव्यांची तपासणी करून दाखले वितरीत करण्यासाठी तातडीने यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले त्यानुसार या विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यात कुणबी संदर्भात काही दिवसांपूर्वीच पुरावे आढळून आले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार आता प्रत्येक तहसील पातळीवर यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे.
यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची यासाठी समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तहसील पातळीवरही यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
0 Comments