संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ, शासनाने दुसऱ्या टप्प्यात घेतला निर्णय !
सोलापूर :- वाढती मागणी आणि बळीराजाचा आक्रोश याचा विचार करून अखेर राज्य शासनाने संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला असून आता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना याचा लाभ होणार आहे.
आधी जिल्ह्यातील काही तालुक्यातच दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी सर्सारीपेक्षा कमी पाउस झाला असून तो सत्तर टक्क्यांपेक्षाही कमी आहे. याचा प्रभाव सोलापूर जिल्ह्यातील सगळ्याच शेतकऱ्यावर पडलेला आहे
पण तरीही राज्य शासनाने आधी जिल्ह्यात अर्धवट दुष्काळ जाहीर केला होता. सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी केवळ पाच तालुकेच दुष्काळी म्हणून घोषित केले होते.
बार्शी, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा या तालुक्यांत यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला आहे. प्रत्यक्षात जिल्हाभर दुष्काळी परिस्थिती दिसत असतानाही, पीक सर्व्हेनंतर पाच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले
आणि उर्वरित तालुक्यात अस्वस्थ पसरली. लोकाप्रतीनिधीवर देखील यामुळे दबाव वाढला आणि लोक प्रतिनिधींनी शासनाकडे, आपला मतदारसंघ दुष्काळी म्हणून घोषित करण्यातही सातत्याने मागणी सुरु केली होती.
अखेर जनतेची मागणी आणि आमदारांचा दबाव कामाला आला आणी उर्वरित तालुक्यांना दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे आता संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळी म्हणून गणला जाणार असून, सर्वानाच सवलतींचा लाभ मिळू शकणार आहे.
शासनाने पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळी जाहीर केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात शेळगी, तिह, मार्डी,
वडाळा, सोलापूर, बोरामणी, वळसंग, मंद्रुप, होटगी, निंबर्गी, विंचूर, अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किणी, कामती, टाकळी सिकदर, पेनूर, वाघोली,
नरखेड, सावळेश्वर, शेटफळ, मोहोळ, मोडनिब, पंढरपूर, भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळूज, चळे, तुंगत, कासेगाव, बोराळे, मरवडे, आंधळगाव, मारापूर, मंगळवेढा, भेसे, हुलजंती या महसुली मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
याचा मोठा लाभ होणार असून पीक कर्ज वसुलीला स्थगिती मिळणार आहे तसेच आठ सवलती देखील मिळू शकणार आहेत. या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
0 Comments