धक्कादायक ....मुंबईत एका महिला डॉक्टरवर बलात्कार; 38 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!
मुंबई: मुंबईत एक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळे नागरिकांच्या मनात सतत सुरक्षतेचा प्रश्न उभा राहत आहे. अशातच मुंबईत एका महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एका 38 वर्षीय व्यक्तीला बेडया ठोकल्या आहेत. सदरील प्रकरणी आरोपीवर गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळत असताना त्यांची ओळख झाली होती. पुढे त्यांची चांगलीच मैत्री झाली. सदरील पीडित महिला काही घरगुती कारणांमुळे एकटी आणि पतीपासून वेगळी राहत आहे.
महिलेचा आरोप आहे की, एका महत्वाच्या कामानिमित्त आरोपीने डॉक्टर महिलेला बोलण्यासाठी भेटायला बोलावले. परंतु जेव्हा ती त्याला भेटायला गेली तेव्हा त्याने तिला जबरदस्तीने मद्यपान करण्यास भाग पाडले.
ड्रिंक जास्त झाल्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला.आणि काही आक्षेपार्ह व्हिडीओ मोबाईल मध्ये काढले.
त्यानंतर त्याने डॉक्टर महिलेला पैसे मागितले. आणि पैसे न दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडून पैसे घेतले.
परंतु पीडित महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतला.आणि गावदेवी पोलीस ठाण्यात आरोपीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गावदेवी पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला शोधून अटक केले आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास गावदेवी पोलीस करत आहेत.
0 Comments