सांगोला शहरात शिबिरातून रामनामाचा प्रचार, प्रसार आणि विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची होणार1 जोपासना!
चैतन्य जप प्रकल्पाचे २३ व्या राज्यस्तरीय शिबिराचे येथे आयोजन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि वै.श्रीपाद काका जोशी (महाराजांचे पोस्टमन) यांच्या प्रेरणेतून चालू झालेल्या
चैतन्य जप प्रकल्पाचे शिबिर प्रमुख आणि कार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगोला येथील जपकार आणि समस्त रामनाम प्रेमी यांच्या अथक परिश्रमातून दिनांक १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान
२३ वे राज्यस्तरीय शिबिर सांगोला येथील रामकृष्ण व्हिला गार्डन मंगल कार्यालय येथे होणार असल्याची माहिती चैतन्य जप प्रकल्पचे कार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या राज्यस्तरीय चैतन्य जप प्रकल्पात दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वा पालखी शोभायात्रा मिरवणूक व सर्वरोगनिदान शिबिराचा शुभारंभ आणि १० : २० वा. चैतन्य जप शिबिराचे उद्घाटन जपकार श्री. व सौ. हौसाबाई पिराजी धायगुडे,
संत मोहनबुवा रामदासी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार राम सातपुते, मा. आमदार दीपकआबा साळुंखे, डॉ.बाबासाहेब देशमुख,
चेतनसिंह केदार, सौ. जयमालाताई गायकवाड, मुख्याधिकारी सुधीर गवळी, डॉ. प्रभाकर माळी, प्रा.पी.सी. झपके सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून दिवसभर श्रीराम जय राम जय जय राम सामुदायिक नामजप, जपकारांची मनोगते,
आदी होणार असून शनिवारी सायंकाळी ४:०० ते ६:००या वेळेत ह.भ.प.विलासबुवा गरवारे यांचे नारदीय कीर्तन, रात्री १० ते ११ ख्यातनाम भारूडकार संदीप मोहिते आणि आण्णा चव्हाण यांची भारुड जुगलबंदी होणार आहे.
तसेच रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३०ते ९:०० बोलक्यापरास मुकी बरी वृषाली कुलकर्णी आणि शुभदा थिटे यांची नाटिका सादर होणार आहे. त्यानंतर सकाळी ९:००वा. सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान
शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे
त्यानंतर १०:४५ ते ११ शिबिराचे प्रमुखकार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख यांचे निरुपन होणार आहे.आणि या शिबिराची सांगता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार जयवंत महाराज बोधले यांच्या अमृतवचनाने होणार असून या चैतन्य शिबिरात महाराष्ट्रातील हजारो जपकारांची उपस्थिती असणार आहे.
तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रामनामाचा जप करत आयुष्य सार्थकी लावावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी सेवेकरी प्रसाद महादार, चेतन कोवाळे, रमेश देवकर, संतोष भोसले,
सांगोला शिबिर प्रमुख मधुकर कांबळे तसेच राजेंद्र आगवणे, गणपतराव जगताप,साहेबराव देशमुख, विजय लोंढे, पद्मजा देव,अर्जुन जाधव, अश्विनी देऊरकर, आणि सांगोला येथील सर्व जपकार मंडळी परिश्रम घेत आहेत.शिबिराच्या अधिक माहितीसाठी 9422028588
किंवा 9922893425 या भ्रमनध्वनीवर संपर्क
साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments